

ganesh kale murder pune
esakal
पुण्यात पुन्हा एकदा गँगवॉरने डोके वर काढले असून, कोंढवा परिसरात गणेश काळे यांची गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. प्राथमिक तपासात ही हत्या गँगवॉरमधूनच झाल्याची माहिती मिळत आहे. दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास दोन दुचाकीवरून आलेल्या चार आरोपींनी हा हल्ला केला. गणेश काळे याच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्या, त्यापैकी तीन लागल्या, तर हल्लेखोरांनी शस्त्रानेही त्याच्यावर वार केले. संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.