

ganesh kale pune
esakal
पुणे शहरातील गुन्हेगारी विश्वात पुन्हा एकदा टोळीयुद्धाची ठिणगी पडली आहे. कोंढव्यातील खडी मशीन चौकात शनिवारी (ता. १) दुपारी भररस्त्यात दुचाकीस्वार हल्लेखोरांनी एका तरुणावर पिस्तुलातून सलग गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून निर्घृण खून केला. हा तरुण माजी नगरसेवक वनराज आंदेकर खून प्रकरणातील आरोपीचा मोठा भाऊ असून, तो सोमनाथ गायकवाड टोळीचा सक्रिय सदस्य होता.