

Young Shepherd Achieves Dream Ganesh Kargal Joins Indian Army
Sakal
निरगुडसर : आमच्या खानदानात कुणी शिकलं नाही मी स्वतः अंगठे बहादुर आहे पण मुलाने मेंढ्या सांभाळत अभ्यास केला आणि आमचा कुटुंबातील अंगठे बहादुर हा शब्द पुसून टाकला आणि सर्वांचे स्वप्न सत्यात उतरवायची जिद्द गणेशने ठेऊन आज सत्यात उतरवल्याचा खूप आनंद होत असल्याची भावना वडील मारुती विष्णू करगळ थोरांदळे(ता.आंबेगाव) यांनी सकाळाशी बोलताना व्यक्त केली.गणेश मारुती करगळ वयाच्या १९ व्या वर्षी भारतीय सैन्य दलात निवड झाल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.