

Forest Minister Ganesh Naik to Review Implementation in Pune on Nov 12
sakal
मंचर : एक हजार पिंजरे खरेदीसाठी १० कोटी रुपये निधी तातडीने मंजूर केला असून अन्य तातडीच्या उपाय योजना हाती घेण्यात आल्या आहेत. त्यामुळे मानव व बिबट संघर्ष टाळण्यास मदत होईल.” अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली. मुंबई-मंत्रालय येथे मंगळवारी (ता.४) बिबट–मानव वाढलेल्या संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी राज्याचे माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या पुढाकाराने मंत्रालयात राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. यावेळी वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक श्रीनिवास राव, पुणे विभाग वनसंरक्षक आशिष ठाकरे, पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक प्रशांत खाडे व अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.