
प्रकाश शेलार
खुटबाव : खुटबाव (ता. दौंड) येथे एखाद्या चित्रपटाला शोभेल अशी घटना घडली. ३ नोव्हेंबर २०१० रोजी गणेश दत्तात्रेय पासलकर हा दहा वर्षांचा चिमुकला एका घटनेमुळे घर सोडून गेला. कुटुंबीयांनी गणेशचा कसून शोध घेतला. परंतु यश आले नाही. तब्बल १४ वर्षांनंतर दक्षिण भारत भ्रमण आणि अधिवास करून गणेश घरी परतला. त्यामुळे कुटुंबीयांच्या डोळ्यांमध्ये आनंदाश्रू तरळले.