
कर्वेनगर : काही दिवसांवर येऊन ठेपलेला सार्वजनिक गणेशोत्सवाची तयारी शहरासह उपनगरांमध्ये सुरू आहे. याचाच एक भाग असलेल्या कर्वेनगर व वारजे भागांतील विसर्जन घाटांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. परिसरातील पायऱ्या मोडकळीस आल्या असून फरशी उखडलेली आहे. रेलिंग तुटले आहेत. परिसराची साफसफाई होत नसल्याने पायऱ्यांवर कचरा साचलेला आहे. तसेच, हौदाच्या कडेला गवत उगवले आहे. याबाबत प्रशासन मात्र गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.