
कर्वेनगर : पुणे महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी वारजे-कर्वेनगर परिसरातील विसर्जन घाटावरील तयारीची पाहणी केली. विसर्जनादरम्यान गणेशभक्तांना मूर्ती विसर्जन करताना तसेच निर्माल्य विघटीकरण करताना समस्या येणार नाही, याची काळजी घेतली जात आहे. मनपा व्यवस्था तैनात करण्यात आल्या असून सर्व घाटांवर सीसीटीव्ही दर्शनी भागात बसविण्यात आले आहेत.