पिंपळे सौदागर : पिंपळे सौदागर परिसरात गणेश विसर्जन मिरवणुकीत दोन लहान मुले कुटुंबापासून दुरावली. पण, त्यांना त्यांच्या सुरक्षित हक्काच्या कुशीत परत पोहोचवायला संवेदनशील पोलिस अधिकारी माणुसकीचे देवदूत ठरले..मिरवणूक पाहायला बाहेर पडलेली तीन वर्षांचा आरव आणि नऊ वर्षाची त्याची मावस बहीण मानवी ही दोघे भावंडे गडबडीत घरचा रस्ता चुकली. गणेश वाशिनकर नावाच्या तरुणाने त्यांच्या रडण्याकडे लक्ष दिले आणि पिंपळे सौदागर येथील पोलिसांशी संपर्क साधला. पोलिस निरीक्षक अमोल नांदेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचारपूस करत त्यांची भीती कमी करण्याचा प्रयत्न केला..नांदेकर यांनी आरवला जवळ घेतले शांत केले. उपनिरीक्षक राजश्री पाटील यांनी आपल्या लेकीसारखी समजूत घातली. आरव आणि मानवी हरविल्याचे लक्षात आल्यानंतर आरवची आई आरती राठोड घाबरलेल्या अवस्थेत सौदागर पोलिस चौकीत पोहोचल्या. आईच्या कुशीत आरव शांत झोपल्यासारखा झाला; तर मानवीच्या डोळ्यांत दिलासा उतरला..पालकांनी मुलांना घराच्या बाहेर किंवा गर्दीच्या ठिकाणी खेळण्यास पाठवताना अधिक सतर्क राहावे आणि त्यांच्यावर सतत लक्ष ठेवावे हे आवश्यक आहे. समाजाने जबाबदार नागरिकत्वाचे भान ठेवून अशा प्रसंगात पोलिसांना सहकार्य करणे महत्त्वाचे आहे.- अमोल नांदेकर, पोलिस निरीक्षक, सांगवी पोलिस ठाणे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.