पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीबाबत निर्माण झालेला वाद अखेर मिटला. मिरवणूक आता सकाळी एक तास अगोदर म्हणजे साडेनऊ वाजता सुरू करून यंदाही परंपरेनुसार आणि दरवर्षीच्या क्रमाने काढण्यात येणार आहे. सर्व मंडळांकडून एकमताने हा निर्णय घेण्यात आला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेत या प्रश्नावर तोडगा काढला.