
पुणे : पुणे महापालिकेच्या सिंहगड रस्त्यावरील आणि ‘पीएमआरडीए’ने बांधलेल्या गणेशखिंड रस्त्यावरील उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले असले, तरी अद्याप उद्घाटनासाठी वेळ मिळाला नसल्याने हे पूल वाहतुकीसाठी खुले कधी होणार, असा प्रश्न कायम आहे, पण यामुळे सर्वसामान्य नागरिकांना रोज वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.