esakal | वाजतगाजत आले गणराय...
sakal

बोलून बातमी शोधा

Ganeshotsav

मानाच्या पाचही गणपतींची भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिष्ठापना होत असताना पेठांमधील इतर प्रमुख गणपतींच्या मोठ्या थाटात मिरवणुका निघाल्या. मंडई आणि बाबू गेनू गणपती मंडळाचा मयूररथ, दगडूशेठ मंडळाचा शेषात्मज सुंदर सजवले होते. त्याचसोबत बॅंड पथकावर वाजविली जाणारी भक्तिगीते, ढोल-ताशांच्या तालबद्ध वादनाने या मिरवणुकांच्या भव्यतेत आणखी भर पडली. पेठांमधील गणपतींच्या मिरवणुकांनी परिसर श्रींच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

वाजतगाजत आले गणराय...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - मानाच्या पाचही गणपतींची भक्तिमय वातावरणामध्ये प्रतिष्ठापना होत असताना पेठांमधील इतर प्रमुख गणपतींच्या मोठ्या थाटात मिरवणुका निघाल्या. मंडई आणि बाबू गेनू गणपती मंडळाचा मयूररथ, दगडूशेठ मंडळाचा शेषात्मज सुंदर सजवले होते. त्याचसोबत बॅंड पथकावर वाजविली जाणारी भक्तिगीते, ढोल-ताशांच्या तालबद्ध वादनाने या मिरवणुकांच्या भव्यतेत आणखी भर पडली. पेठांमधील गणपतींच्या मिरवणुकांनी परिसर श्रींच्या जयघोषाने दुमदुमून गेला.

अखिल मंडई मंडळ
‘गणपती बाप्पा मोरया’चा गजर आणि ढोल-ताशा, बॅंडच्या निनादात गणपतीची मयूर रथातून मिरवणूक काढण्यात आली. चैतन्यमयी वातावरणात तीर्थंकर जैन मंदिरात शारदा-गजानन मूर्तीची प्रतिष्ठापना भारतीय जैन संघटनेचे संस्थापक शांतिलाल मुथा यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली. मंदिरापासून निघालेली मिरवणूक रामेश्वर चौक, गोटीरामभैय्या चौकातून झुणका भाकर केंद्रामार्गे उत्सव मंडपात आली. न्यू गंधर्व बॅंड, राजमुद्रा, नादस्वरूप, मृत्युंजय ही ढोल ताशा पथके सहभागी झाली होती. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांनी पौरिहित्य केले. रथाचे सारथ्य मंडळाचे ज्येष्ठ सल्लागार मधुकर सणस, अशोक शिर्के, कांताभाऊ मिसाळ यांनी केले.

दगडूशेठ हलवाई गणपती 
शेषात्मज रथातून सकाळी साडेआठ वाजता मिरवणूक सुरू झाली. या वेळी भाविकांनी मोरया, मोरयाचा जयघोष केला. श्री गणेश सूर्यमंदिरात सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी शिर्डी कोकमठाण येथील प. पू. विश्वात्मक ओम गुरुदेव जंगलीदास महाराज यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली. 

तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, नगरकर तालीम चौक, शनिपार चौक, टिळक पुतळा मंडई मार्गे मिरवणूक उत्सव मंडपात आली. 
देवळणकर बंधूंचा चौघडा, गायकवाड बंधू सनई, प्रभात बॅंड, मयूर बॅंड, दरबार बॅंड यांसह चिंचवड गाव येथील गंधाक्ष वाद्यपथक सहभागी झाले. मुख्य पूजा मिलिंद राहुरकर गुरुजी यांनी केली. 

भाऊसाहेब रंगारी गणपती 
स्वातंत्र्यपूर्व काळातील लाकडी रथातून श्रींची मिरवणूक काढण्यात आली. बुधवार चौकात मिरवणूक आल्यानंतर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांनी रथाचे सारथ्य केले. श्रीराम, कलावंत, सामर्थ्य, वाद्यवृंद ही पथके सहभागी झाली होती. आप्पा बळवंत चौक, महर्षी पटवर्धन चौक मार्गे ही मिरवणूक उत्सव मांडपात आली. भिडे गुरुजी, उत्सव प्रमुख पुनीत बालन यांच्या हस्ते सकाळी ११ वाजता प्रतिष्ठापना करण्यात आली.  

हुतात्मा बाबू गेनू मंडळ 
मिरवणूक सकाळी नऊ वाजता मंडईतील लोकमान्य टिळक पुतळा येथून निघाली. शनिपार चौक, लिंबराज महाराज चौक, बेलगाब चौक, रामेश्‍वर चौकातून उत्सव मंडपात आली. 

दुपारी एक वाजता मंडळाचे संस्थापक शिवाजीराव मुजुमले, विश्‍वास शितोळे, उद्योगपती सौरभ कुलकर्णी यांनी ‘श्रीं’ची प्राणप्रतिष्ठा केली. गजलक्ष्मी, शिवतेज, रुद्रगर्जना, श्रीराम ही ढोल पथके मिरवणुकीत सहभागी झाली होती.

loading image
go to top