esakal | अग्निशमन साहित्यापासून बाप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

एरंडवणे - अग्निशमन साहित्यापासून साकारलेल्या गणपतीसमवेत गायत्री.

एरंडवण्यातील अग्निशमन केंद्रात आग आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शंक्वाकृती साधनांसह घमेले, अग्निशमन वाहनाचे हेडलाइट, होजपाइप, गळ आदी सहा-सात प्रकारच्या वस्तूंपासून गणेशमूर्ती साकारली आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून येथे ही गणेशमूर्ती विराजमान आहे.

अग्निशमन साहित्यापासून बाप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - एरंडवण्यातील अग्निशमन केंद्रात आग आटोक्यात आणण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शंक्वाकृती साधनांसह घमेले, अग्निशमन वाहनाचे हेडलाइट, होजपाइप, गळ आदी सहा-सात प्रकारच्या वस्तूंपासून गणेशमूर्ती साकारली आहे. सुमारे पंधरा वर्षांपासून येथे ही गणेशमूर्ती विराजमान आहे.

प्रमुख अधिकारी राजेश जगताप म्हणाले, ‘‘अग्निशामक दलाच्या कार्याची माहिती सर्वसामान्यांना करून देण्यासाठी व आग लागू नये, यासाठी कोणती काळजी घ्यावी या संदर्भात जनजागृतीसाठी या केंद्रात भव्य संग्रहालय उभारले आहे. वर्षभरात साठ शाळांमधील विद्यार्थी ते पाहायला येतात. देशातले पहिले अग्निशमन संग्रहालय बघायला येणाऱ्या बालकांना हा गणपतीबाप्पा आकर्षित करतो. याची आठवण दीर्घ काळ त्यांना राहते व या माध्यमातून अग्निशमनाबाबत जारूकताही त्यांच्यात नकळत निर्माण होते. या बाप्पाला बघायला येणारी गायत्री म्हणाली, ‘‘मोठी झाल्यावर अग्निशामक दलात काम करायचे आहे, असे मी या बाप्पाला सांगत असते.’

loading image
go to top