
पुणे : ‘‘मागील वर्षी गणेशोत्सवामध्ये ज्या अटी व शर्तीवर गणपती उत्सव साजरा झाला, त्याच अटी यावर्षीही लागू असतील. मागील वर्षीची परवानगी यावर्षी चालणार आहे. कोणतेही एकतर्फी निर्बंध लावण्यात येणार नाहीत. गणेशोत्सव निर्बंधमुक्त आणि भयमुक्त असेल,’’ अशी ग्वाही पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.