esakal | इंदापूर शहर व परिसरात फटाक्याचा अतिशबाजीत गणेशोत्सवास प्रारंभ.
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

इंदापूर शहर व परिसरात फटाक्याचा अतिशबाजीत गणेशोत्सवास प्रारंभ.

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर (Indapur) शहर व परिसरात पाऊसाची आळवणी करत तसेच कोरोना (Corona) महामारीचे निर्मूलन व्हावे अशी प्रार्थना करत ५० हुन जास्त सार्वजनिक मंडळांनी तसेच हजारो भाविकांनी घरगुती विघ्नहर्त्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना केली.

यावेळी फुलांची उधळण तसेच फटाख्यांची आतषबाजी करण्यात आली. या महोत्सवावर कोरोना महामारीची आचारसंहिता असलीतरी मोठ्या उत्साहात गणेशपूजन व अथर्वशीर्ष पठण करून श्री गणेशाचे आगमन झाले. शहरातील मानाच्या पहिल्या सिद्धेश्वर मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालकनागेश भंडारी यांनी सपत्नीक केली तर नवजवान मंडळाच्या गणपतीची प्रतिष्ठापना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, मंडळाचे अध्यक्ष मनोज घोलप, उपाध्यक्ष बापूसाहेब राहिगुडे, निलेश घोलप यांच्या हस्ते झाली. ज्यभवानी मंडळाच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा प्रदीप गारटकर, राष्ट्रवादीकॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल राऊत यांच्या हस्ते झाली.

धर्मवीर संभाजी मंडळाची प्रतिष्ठापना मंडळाचे अध्यक्ष विनायक बाब्रस तर पोरा पोरांची चावडी मंडळाच्या श्री गणेशाची प्रतिष्ठापना माजी नगराध्यक्ष सुरेश गवळी, नगरसेवक भरत शहा यांच्या हस्ते करण्यात आली. बहुतेक मंडळांनी मंडळाचे अध्यक्ष व जेष्ठ सदस्यांच्या हस्ते विधिवत प्रतिष्ठापना केली. कोरोनामुळे ठप्प झालेले अर्थकारण, शासन व प्रशासनाची कडक आचारसंहिता याचे सावट या महोत्सवावर दिसून आले. मात्र तरीसुद्धा युवापिढी व घरगुतीगणेशोत्सवा मोठा उत्साह दिसून आला तर हालगी,ताशा, डी जे यांना परवानगी नसल्याने त्यांचे अर्थकारण पूर्णपणे ठप्प झाल्याचे दिसून आले.

हेही वाचा: पुणे : सार्वजनिक गणेश मंडळांचा एकच गणपती

दरम्यान शासन व स्वयंसेवी संस्थांनी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे तसेच घरगुतीगणेश सजावटीसाठी बक्षिसे ठेवली मात्र महोत्सवाचे चांगले व वस्तुनिष्ठ वार्तांकन करणाऱ्या बातमीदार, वार्ताहरास बक्षीस न ठेवल्याची खंत अखिल भारतीय मराठी पत्रकारपरिषदेचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख काकासाहेब मांढरे यांनी व्यक्त केली.

loading image
go to top