esakal | पुणे : सार्वजनिक गणेश मंडळांचा एकच गणपती
sakal

बोलून बातमी शोधा

GANPATI

पुणे : सार्वजनिक गणेश मंडळांचा एकच गणपती

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

येरवडा : एक गाव एक गणपती असो कि एक वॉर्ड एक गणपती शहरातील उपनगरांमध्ये आज पर्यंत शक्य झाले नव्हते. मात्र कोरोनाच्या संसर्गाच्या पाश्‍वभूमीवर येरवड्यातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळांनी एक गणपती बसविला आहे. यावर्षी देखील अनेक मंडळांनी साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करणार असल्याची माहिती येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसून शेख यांनी दिली.

येरवडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुमारे पावणे दोनशे नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे आहेत. त्यापैकी यावर्षी अनेक मंडळांनी एक गणपती बसविण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक मंडळांच्या अध्यक्षांनी परिसरातील तीन ते चार मंडळांच्या वतीने एकच श्रीची मूर्ती बसवून साध्या पद्धीतीने गणेशोत्सव साजरा करणार असल्याचे सांगितले. येरवडा परिसरातील अकरा हजार घरगुती श्रीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना झाल्याचे शेख यांनी सांगितले.

हेही वाचा: इंग्लंडची चिटींग; रद्द झालेला सामना जिंकून टीम इंडियाशी बरोबरी?

येरवडा बाजारपठेत शुक्रवारी सकाळ पासूनच पुजेचे साहित्य घेण्यासाठी नागरिकांची लगबग सुरू होती. येरवडा गाडीतळ येथे गणेश मूर्त्यांच्या स्टॉलवर घरगुती गणपती घेणाऱ्यांची तुरळक गर्दी होती. सार्वजनिक मंडळांचा अल्प प्रतिसाद व घरगुती मूर्ती घेणाऱ्यांची संख्या कमी झाल्यामुळे विक्रेते चिंतेत दिसत होते. यावर्षी पर्यावरणपुरक शाडुच्या गणेश मूर्त्यांना चांगली मागणी असल्याचे दिसत होते.

श्रीच्या मंडपाजवळ गर्दी टाळा

येरवडा पोलिस ठाण्यात झालेल्या गणेशमंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत सहायक पोलिस आयुक्त किशोर जाधव यांनी मार्गदर्शन केले.कोरोनाच्या पाश्‍वभूमिवर कोणत्याही प्रकारच्या मिरवणूका काढण्यात येऊ नये, गर्दी होईल असे देखावे सादर करू नये, सामाजिक अंतर राखले जाईल, मास्क व सॅनेटायझरचा वापर करण्यात यावा, मंडपाजवळ गर्दी करू नये, अशा सुचना त्यांनी दिल्या.

loading image
go to top