esakal | गणपतीची ‘इको फ्रेंडली’ आरास करायला शिका
sakal

बोलून बातमी शोधा

Makhar

यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा व स्वत:च्या हातांनी मखर तयार करता यावी म्हणून ‘सकाळ यंग बझ’तर्फे ‘इको फ्रेंडली मखर कार्यशाळा’ घेण्यात येणार आहे. चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रविवारी (ता. २५) सकाळी १० ते १२ व पुणे येथील सकाळ कार्यालयात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.

गणपतीची ‘इको फ्रेंडली’ आरास करायला शिका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक व्हावा व स्वत:च्या हातांनी मखर तयार करता यावी म्हणून ‘सकाळ यंग बझ’तर्फे ‘इको फ्रेंडली मखर कार्यशाळा’ घेण्यात येणार आहे. चिंचवड येथील नॉव्हेल इंटरनॅशनल स्कूलमध्ये रविवारी (ता. २५) सकाळी १० ते १२ व पुणे येथील सकाळ कार्यालयात सायंकाळी ४ ते ६ या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे.  

प्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येकाने गणेशमूर्ती व सजावट इको फ्रेंडली कशी होईल, यासाठी प्रयत्न करायला हवा. पर्यावरणपूरक गणेशोत्सव ही संकल्पना घराघरांत जावी, या उद्देशाने या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. 

प्लॅस्टिक व थर्माकोलचा वापर न करता पेपरपासून मखर कसे तयार करायचे, याविषयी मार्गदर्शन मिळणार आहे. यामध्ये पेपरची ओरिगामी रंगीत फुले कशी तयार करायची व त्यापासून मखर बनवायला शिकवणार आहे. यासाठीचे सर्व साहित्य मिळणार असून, येताना वर्तमानपत्र, फेव्हिकॉल व रुमाल सोबत आणायचा आहे. ही कार्यशाळा सर्वांसाठी खुली असून, यात सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्‍यक आहे.

शुल्क - रु. ५०० सर्व साहित्यांसह (ऑनलाइन सुविधा उपलब्ध) 
अधिक माहितीसाठी - ८८०५००९३९५ किंवा ९५५२५३३७१३

loading image
go to top