कोविड पेशंटसाठी बेड हवाय? पु्ण्यात गणेशोत्सव मंडळांकडेही मिळणार हॉस्पिटल्सची माहिती

ganeshotsav Mandals are now keeping watganeshotsav Mandals are now keeping watch on private clinics and doctorsch on private clinics and doctors
ganeshotsav Mandals are now keeping watganeshotsav Mandals are now keeping watch on private clinics and doctorsch on private clinics and doctors
Updated on

पुणे : आपल्या परिसरातील खासगी डॉक्‍टर आणि दावाखान्यांमधून नागरिकांना वैद्यकीय सुविधा सुरळीत मिळतील, याची जबाबदारी आता गणेश मंडळे आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींवर सोपविण्यात आली आहे. तसेच कोविड-19 च्या रुग्णांसाठी असलेली खासगी व शासकीय हॉस्पिटलमधील राखीव बेडची माहिती परिसरातील नागरिकांना पुरविण्याची जबाबदारी त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाविरोधातील लढ्यात स्वयंसेवी संस्था, सार्वजनिक गणेश मंडळे यांच्यासह समाजातील विविध घटकांची मदत घेण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी शहरातील प्रमुख गणेशोत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था, एनजीओसह विविध क्षेत्रातील मान्यवरांची बैठक घेतली होती. या बैठकीमध्ये मदतीचे आवाहन करण्यात आले होते. तसेच कोणत्या स्वरूपाची मदत लागणार आहे, यांची माहिती उपलब्ध करून देण्यात येईल, असे ही प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी ही नियमावली तयार करून मंडळ, स्वयंसेवी संस्थांना पाठविली आहे. 

त्यामध्ये नागरिकांकडून सॅनिटायझर व मास्कचा वापर होते आहे की नाही यावर लक्ष ठेवणे, सोशल डिस्टसिंग पाळले जाते की नाही, हे पाहणे, विनाकारण बाहेर पडणाऱ्या नागरिकांवर लक्ष ठेवणे, जास्तीत जास्त नागरिकांची अँटीजेन टेस्ट करून घेणे, कॉन्टॅक्‍ट ट्रेसिंग मध्ये सहाय्य्य घेणे या प्रमुख बाबींसह घरी विलगीकरण केलेल्या कोरोना रुग्णांवर लक्ष ठेवणे व त्यांना साहाय्य करणे, झोपडपट्टी क्षेत्रातील सार्वजनिक स्वछतागृहे यांची स्वछता दररोज होते की नाही यावर लक्ष देणे,लॉकडाऊनच्या कालावधीत गरजू नागरिकांना विशेषतः: बेघर, विद्यार्थी यांची भोजनाची व्यवस्था करणे आदी जबाबदारी मंडळ आणि स्वयंसेवी संस्थांवर सोपविण्यात आली आहे. 

Breaking : महाविद्यालय स्तरावर होणार परीक्षा?; 'यूजीसी'चे उपाध्यक्ष काय म्हणाले पाहा!

एवढेच नव्हे, तर आपल्या परिसरातील खासगी दवाखाने, डॉक्‍टर यांच्याकडून वैद्यकीय सुविधा सुरळीत राहतील. नागरिकांना किरकोळ स्वरूपाच्या आजारासंदर्भात योग्य ते उपचार मिळतील, यावर लक्ष ठेवणे, कोरोना बाधितांसाठी शासकीय व खासगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असलेल्या बेडस्‌ची माहिती मोबाईलच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ही त्यांच्यावर टाकण्यात आली आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com