

Ganeshotsav Traffic In Pune Warje Faces Seven Hour Jam From Navale Bridge To Chandni Chowk With Service Roads Also Packed
sakal
वारजे : गणेशोत्सवासाठी गावाकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या शनिवारी अचानक मोठ्या प्रमाणात वाढल्याने वारजे परिसरात तब्बल सात तास वाहतूक कोंडी झाली. सकाळी सात वाजल्यापासून दुपारी दोनपर्यंत नवले पूल ते चांदणी चौक या दरम्यान महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यानंतर अनेक वाहनचालकांनी सेवा रस्त्याचा पर्याय स्वीकारल्याने सेवा रस्ताही वाहनांनी भरून गेला. त्यामुळे वारजे परिसरातील अंतर्गत वाहतूक व्यवस्थेवरही मोठा ताण आला.