दारु पिताना हाकलून लावले म्हणून टोळक्‍याने दोघांना.....

The gang allegedly beat two men for After drunk in Pune
The gang allegedly beat two men for After drunk in Pune
Updated on

पुणे : दारु पिऊन गोंधळ घातल्याचा जाब विचाऱ्याच्या कारणावरुन टोळक्‍याने भरदिवसा गॅरेज व्यावसायिकांना लोखंडी सळई, लाकडी दांडके व बाटल्यांनी जबर मारहाण केली. हा प्रकार बुधवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास गणेशखिंड रस्त्यावरील ईस्क्वेअर चित्रपटगृहाजवळ घडला. याप्रकरणी चतुःश्रृंगी पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रशिद शेख (वय 51, रा.गोखलेनगर), रमेश मारणी असे जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी शेख यांनी फिर्याद दिली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक डि.एस. शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख यांचे ईस्क्वेअरजवळील श्री सेवा पेट्रोल पंपाजवळ गॅरेज आहे.

आझम खान यांना न्यायालयाचा दणका! पत्नी आणि मुलासह तुरुंगात

बुधवारी दुपारी साडे बारा वाजता फिर्यादी व त्यांचे मित्र मारणी असे दोघेजण फिर्यादीच्या गॅरेजमध्ये बोलत बसले होते. त्यांच्या गॅरेजजवळच असलेल्या दुसऱ्या गॅरेजमधील मोकळ्या टेबलावर त्यांच्या ओळखीचे तिघेजण व अन्य आठ ते दहा जण मद्यपान करीत होते. दारु पिऊन ते मोठ्या प्रमाणात गोंधळ घालत होते. त्यामुळे फिर्यादी व मारणी यांनी त्यांचे नातेवाईक सतीश धोत्रे यांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर धोत्रे यांनी संबंधीत ठिकाणी येऊन त्यांना हाकलून लावले. त्याचा राग आल्याने आरोपींनी फिर्यादी व मारणी यांना लोखंडी सळई, बिअरच्या बाटल्या लाकडी दांडक्‍याने जबर मारहाण केली. या घटनेमध्ये दोघेही गंभीर जखमी झाले.या घटनेनंतर पोलिसांनी सहा जणांना अटक केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Prayers for Rain: Addressing Drought-Like Conditions
Eco-Friendly Revolution: Mandar Arts Captures High-Profile Locations
Water Dispute and Assault Case: Court Verdict
Unique Tradition: 'Ek Gaon Ek Ganpati' in Ranjangaon and Surrounding Areas
Marathi News Esakal
www.esakal.com