सराफ दुकानावर दरोडा टाकणार होती टोळी; पोलिसांनी उधळला डाव

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

युनिट-3 मधील पोलिस नाईक अतुल साठे, हवालदार संतोष शिरसागर, सहायक पोलिस फौजदार किशोर शिंदे यांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, पोलिस रेकॉर्डवरील आरोपी विशाल सातपुते हा त्याचे साथीदारांसह मगर पट्टा हडपसर येथे एका फ्लॅटमध्ये थांबलेला आहे.

पुणे : हडपसर येथील प्रसिद्ध सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आलेल्या टोळीला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्टल व चार जिवंत काडतुसे, एक भारतीय बनावटीचा रिव्हॉल्वर व सहा काडतुसे व एक बारा बोर रायफल व दोन कोयते अशी हत्यारे तसेच एक फॉर्च्युनर कार व अ‍ॅक्टिवा असा एकूण 14 लाख 74 हजार 840 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली असून त्यातील पाच जण हे सराईत गुन्हेगार आहेत. विशाल उर्फ जंगल्या श्याम सातपुते (वय 30, रा.पीएमसी कॉलनी डी/82 घोरपडी पेठ), राजू शिरीष शिवशरण (वय 28, रा.सर्वे नंबर 110, ठोंबरे वस्ती), पंकज सदाशिव गायकवाड (वय 34, रा. कोलवडी, ता.हवेली), आकाश राजेंद्र सकपाळ (वय 26, रा. बी/1 फ्लॅट नं 3, रविराज टेरेस, सुखसागर नगर), गणेश मारुती कुंजीर (वय 27, रा. कुंजीर वस्ती, थेऊर),  रामेश्वर बाळासाहेब काजळे (वय 33 रा. वडगाव शेरी) आणि ऋषिकेश राजेंद्र पवार (वय 19 रा.  कोलवडी, हवेली) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपींवर विविध कलमानुसार हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बाप रे! पुणे जिल्ह्यात ऑगस्टअखेर होणार कोरोना रुग्णांची 'एवढी' संख्या

युनिट-3 मधील पोलिस नाईक अतुल साठे, हवालदार संतोष शिरसागर, सहायक पोलिस फौजदार किशोर शिंदे यांना सूत्रांकडून माहिती मिळाली की, पोलिस रेकॉर्डवरील आरोपी विशाल सातपुते हा त्याचे साथीदारांसह मगरपट्टा हडपसर येथे एका फ्लॅटमध्ये थांबलेला आहे. तो हडपसर येथील प्रसिद्ध सराफाच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस उपनिरीक्षक किरण अडागळे यांनी पथकासह  फ्लॅट नंबर 406, मगरपट्टा सिटी येथे छापा टाकून सातपुते याच्यासह त्याच्या इतर 6 साथीदारांना अटक केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gang arrested for robbing jewellery shop