पुणे : दोन दुचाकी चोरांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 दोन दुचाकी चोरांना अटक

पुणे : दोन दुचाकी चोरांना अटक

वाघोली : येथील बाजार तळ परिसरात दोन दुचाकी चोराना बेड्या ठोकण्यात गुन्हे शाखा युनिट सहाला यश आले. त्यांच्याकडून तीन लाख रुपये किमतीच्या 15 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या. सात पोलीस ठाणे हद्दीतून त्यांनी या दुचाकी चोरल्या होत्या. निलेश बाळासाहेब शिवरकर ( वय 33, रा. महातोबाची आळंदी ) व प्रशांत संपत चव्हाण ( वय 34, रा. निमगाव म्हाळुंगी ) असे अटक करण्यात आलेल्या दुचाकी चोरांचे नाव आहे.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे वाघोली बाजार तळ येथे येणार असल्याची माहिती युनिट सहाला मिळाली. त्यांच्या पथकाने त्यांना तेथून अटक केली. त्यांनी आणलेली दुचाकीही आळेफाटा येथून चोरलेली होती. त्यांच्या कडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी 15 दुचाकी चोरल्याची कबुली दिली. त्या सर्व दुचाकी त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आल्या. त्यांनी हडपसर - 5, लोणीकंद - 4, चंदननगर - 2, कोंढवा, कोथरूड, यवत, आळेफाटा प्रत्येकी एक अशा

दुचाकी चोरल्या होत्या. ही कामगिरी युनिट सहाचे पोलीस निरीक्षक गणेश माने, सहायक पोलिस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस अंमलदार मच्छिंद्र वाळके, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, नितीन शिंदे, प्रतीक लाहिगुंडे, सचिन पवार, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, ऋषिकेश टिळेकर, शेखर काटे, नितीन धाडगे, सुहास तांबेकर, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, ज्योती काळे, सुहास तांबेकर, बाळासाहेब सकटे यांच्या पथकाने केली.

Web Title: Gang Two Wheeler Thieves Arrested Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top