

Gangster Nilesh Ghaywal
Sakal
पुणे - कोथरूड गोळीबार प्रकरणातील आरोपी गुंड नीलेश घायवळचा ठावठिकाणा अखेर समोर आला आहे. ब्रिटन उच्चायुक्तालयाशी झालेल्या पत्रव्यवहारानंतर घायवळ सध्या लंडनमध्ये असल्याचे स्पष्ट झाले आहे. घायवळ हा व्हिजिटर व्हिसावर लंडनमध्ये वास्तव्यास असल्याची माहिती युके हाय कमिशनने पुणे पोलिसांना दिली आहे.