
विषाखापट्टनम येथून पुणे कडे जाणा-या वाहनामध्ये व्यवसायाकरीता घेऊन जात असलेल्या 60 लाखाच्या गांजासह 2 आरोपींना ताब्यात घेत तब्बल 70 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Ganja Seized : इंदापूर टोल नाक्यावर गांजासह 70 लाख 20 हजाराचा मुद्देमाल जप्त
इंदापूर - इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस पथकाने गुरुवार (ता.09) रोजी रात्री सरडेवाडी टोल नाका येथे विषाखापट्टनम येथून पुणे कडे जाणा-या वाहनामध्ये व्यवसायाकरीता घेऊन जात असलेल्या 60 लाखाच्या गांजासह 2 आरोपींना ताब्यात घेत तब्बल 70 लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
इंदापुर पोलीस स्टेशन येथे नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांना गुरुवारी यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या कारवाईत रूपेश दिलीप जाधव (रा.वृंदावन पार्क, कसबा, ता. बारामती) व सुनिल तुळशीदास वेदपाठक (रा. वाघज रोड, देवळे पार्क बारामती) या आरोपींना अटक करण्यात आली.
याबाबत अपर पोलीस अधिक्षक आनंद भोईटे, पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका क्रेटा कार मध्ये गांजा घेऊन जात असल्याची माहिती इंदापूर पोलिसांना मिळाली होती त्यानुसार इंदापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रकाश पवार, पोलीस नाईक सलमान खान, बालगुडे, लक्ष्मण सुर्यवंशी, दिनेश चोरमले,सिद्धाराम गुरव, विनोद काळे, गजानन वानोळे, विकास राखुंडे, विक्रम जमादार यांच्या पथकाने सरडेवाडी टोल नाका येथे सोलापूर कडून पुण्याच्या दिशेने निघालेल्या कारला थांबण्याचा प्रयत्न केला.
यावेळी त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला मात्र ते त्यात अपयशी ठरले पोलीसांनी कारमधील दोघांना ताब्यात घेत गाडीची तपासणी केली असता डिक्कीमध्ये व मधल्या सिटचे खाली खाकी रंगाचे चिकटपट्टीचे आवरण 120 पॅकेट्स मिळून आले यामध्ये पोलीसांना कॅनावियस वनस्पतीची पाने फुले, बिया, बोंडे यांचा समावेश असलेला हिरवट तपकीरी रंगाचा असा 60 लाख रुपये किमतीचा एकुण 240 किलो ओलसर गांजा मिळून आला व 10 लाख रुपये किमतीची कार व इतर असा एकूण 70 लाख 20 हजाराचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला.
सदरची कारवाई ग्रामीण पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अपरपोलीस अधिक्षक आनंद भोईटे, उपविभागिय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आल्याची माहिती इंदापूर पोलीस स्टेशचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी दिली.