esakal | पुणे : डीएसकेमध्ये गुंतवणुक करणाऱ्या ठेवीदाराची पैसे न मिळाल्याने आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpat Korke Ateempt Suicide due to payment not reviving from DSK
  • डीएसकेंच्या कंपनीत गुंतवणुक करणाऱ्या ठेवीदाराची गळफास घेऊन आत्महत्या 
  • पैसे न मिळाल्याने नैराश्‍येतुन गळफास घेऊन संपवला जीव 

पुणे : डीएसकेमध्ये गुंतवणुक करणाऱ्या ठेवीदाराची पैसे न मिळाल्याने आत्महत्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांच्या एका कंपनीत गुंतविलेले पैसे परत न मिळाल्यामुळे एका वृद्ध ठेवीदाराने शुक्रवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादाय प्रकार उघडकीस आला आहे. डिएसकेंकडील ठेव परत न मिळाल्क्षामुळे व कौटुंबिक ताणातुन आलेल्या नैराश्‍यातुन त्यांनी आत्महत्या केली असण्याची शक्‍यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

तानाजी गणपत कोरके (वय 60, रा. भीमनगर, घोरपडी) असे आत्महत्या केलेल्या ठेवीदाराचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरके हे रिक्षाचालक होते. त्यांनी पै-पै करुन जमा केलेली चार लाख रुपयांची रक्कम डीएसकेंच्या एका कंपनीमध्ये ठेव स्वरुपात ठेवली होती. संबंधीती ठेवीची मुदत ही 2017 मध्येच संपलेली होती. त्यामुळे त्यांना त्यांची ठेव व त्यावरील व्याज मिळणे अपेक्षित होते. मात्र डीएसके आर्थिक घोटाळ्यानंतर त्यांना मुद्दल व व्याज मिळाले नाही. तसेच ते कौटुंबिक ताण-तणावामुळे त्यांना नैराश्‍य आले होते.

Inside Story : डॉक्टर बॉम्ब आहे तरी कोण? 

दरम्यान, गुरुवारी रात्री त्यांच्या कुटुंबातील सर्वजण जेवण करुन झोपले. त्यानंतर कोरके यांनी घरातील पंख्यालाच गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांच्या कुटुंबीयांनी याप्रकरणी मुंढवा पोलिसांना खबर दिली. पोलिसांना घटनास्थळी कोरके यांनी आत्महत्या करण्यापुर्वी लिहीलेली चिठ्ठी सापडली. पोलिसांनी ती चिठ्ठी जप्त केली. मुंढवा पोलिसांनी याप्रकरणी आकस्मिक मृत्यु अशी नोंद केली आहे. कोरके यांच्या कुटुंबीयांनी शवविच्छेदनानंतर त्यांचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

पैशांमुळे मुलीचे लग्न करु शकलो नाही ! 
डीएसके यांच्या कंपनीत गुंतवलेली रक्कम परत मिळत नाही. मला चार मुली आहेत. तीन मुलींचा विवाह झाला आहे. लहान मुलीचा विवाह ठरत नाही. पैसे नसल्याने मी तिचा विवाह करु शकत नाही. माझा पत्नीबरोबर काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. पैसे परत न दिल्यामुळे डिएसकेंविरुद्ध गुन्हा दाखल करावा.माझ्या पश्‍चात मिळणारी विम्याची रक्कम व अन्य रक्कम ही लहान मुलीला द्यावी, असे कोरके यांनी मृत्युपुर्वीच्या चिठ्ठीमध्ये नमूद केले आहे. 

loading image