![Ganpati festival 2021 Arrival of Ganpati in Pune from Pen pvk99](http://media.assettype.com/esakal%2F2021-07%2Fbb353802-2bf8-482c-9274-4290b02ebb66%2FeSakal___2021_07_24T154355_230.jpg?rect=0%2C0%2C960%2C540&w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
मयुर कॉलनी: अवघ्या दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी पेणमधील शाडू, मातीच्या मुर्ती शुक्रवारी (ता.२३) गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर कोथरूडमध्ये दाखल झाल्या. रंग, इंधन दरवाढ, वाहतूक वाढ यामुळे मुर्तीच्या किंमती वीस टक्क्यांनी वाढल्या आहेत. मुर्तीच्या किंमती ६०० पासून ३५०० पर्यंत आहेत. उंदरावर बसलेला गणपती, पानावरील, कमळावरील,जास्वंद फूलावरील, दगडूशेठ, लालबागचा राजा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मुर्ती विक्रीस उपलब्ध आहेत.
कोथरूड येथील मुर्ती विक्रेते सुबोध महाजन हे मुर्ती खरेदी करणाऱ्या नागरिकांना मुर्ती नोंदणी (बुक) करण्यासाठी मागील ३३ वर्षांपासून हळद, कुंकू लावून पोस्टाने निमंत्रण पाठवतात. मात्र मागील वर्षी कोरोनामुळे पोस्टाने निमंत्रण पाठवायची परंपरा त्यांनी खंडित केली आहे. कोरोना आटोक्यात आला तर पुढील वर्षी पुन्हा पोस्टाने निमंत्रण पाठवण्याची परंपरा सुरू करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पर्यावर पुरक (इको फ्रेंडली) मुर्ती ते विक्री करतात. मुर्ती खरेदीसाठी नागरिकांना वेगवेगळ्या वेळा दिल्या जातात.त्यामुळे कोरोनाचे नियम पाळून मुर्ती खरेदी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मिळते.कोरोनामुळे साधारण वीस टक्के मुर्ती विक्रीवर परिणाम झाला आहे. महाजन दरवर्षी किमान ७० मुर्ती अमेरिकेत निर्यात (एक्सपोर्ट) करत असतात. कोरोनामुळे मागील वर्षापासून निर्यात करणे बंद झाले आहे.
"बाप्पाच्या चरणी प्रार्थना आहे की,कोरोनाचे संकट लवकर दूर होवो.पुर्वी प्रमाणे गणरायाचे आगमन जल्लोषात साजरा करता यावे".
- सुबोध महाजन, मुर्ती विक्रेते,आनंदनगर सोसायटी, पौंड रस्ता कोथरूड.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.