
पुणे : विघ्नहर्ता, बुद्धिदाता अन् सुखकर्ता अशा लाडक्या गणरायाचे वाजत-गाजत आणि मोठ्या थाटात स्वागत करण्यासाठी जय्यत भाविकांनी तयारी केली आहे. गणेशोत्सवाच्या मंगलमय पर्वाला उद्यापासून प्रारंभ होणार असून, त्यासाठी संपूर्ण राज्य जणू ‘गणरंगी’ रंगले आहे. पूजा साहित्य खरेदीसाठी बाजारपेठ फुलल्या असून, फुले, दुर्वा व विविध साहित्यातून कोट्यवधींची आर्थिक उलाढाल होत आहे.