पुणे - गणेशोत्सवातील विसर्जन मिरवणुकीत लवकर सहभागी होण्यावरून निर्माण झालेला प्रश्न सामोपचाराने सोडवू. मानाचे किंवा अन्य गणेश मंडळांमध्ये कोणताही मतभेद नाही. विसर्जन मिरवणुकीबाबत तोडगा काढण्यासाठी सर्व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक आयोजित केली जाणार आहे. याबाबत लवकरच समन्वयाने तोडगा काढू, असा निर्णय मानाच्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी (ता.५) जाहीर केला.