
पिंपरी : गणपतीची आरास खुलविण्यासाठी विद्युत रोषणाई ही हवीच. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, सोसायटी किंवा घरगुती गणपतीसाठीही सध्या मोठ्या प्रमाणावर रोषणाईने सजावट केली जाते. म्हणूनच बाजारातही विद्युत माळांचे असंख्य प्रकार सध्या दाखल झालेले आहेत. यामध्ये एलईडी बल्बच्या माळा, पणत्या, झुंबर, विविधरंगी फोकस यासोबतच नकली फुलांच्या एलईडी माळांना यावर्षी मोठ्या प्रमाणात मागणी आहे. गणपतीच्या, मंदिराच्या किंवा मखराच्या मागे लावण्यासाठी एलईडीचा बल्ब असलेला बॅकड्रॉपही ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. गणेशोत्सवासाठी असंख्य व्हरायटी दुकानात आल्याने शहरातील पिंपरी मार्केटसोबतच उपनगरातील बाजारपेठांही विद्युत रोषणाईंच्या माळांनी लखलखत आहेत.