
पुणे : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा दुमदुमणारा जयघोष, कुठे ढोल-ताशांच्या तालावर, तर कुठे साउंडवरील गाण्यांवर मनसोक्त नृत्य करत सातव्या दिवसाच्या गणपती व गौरींचे मंगळवारी विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीत महिला, तरुणी व लहान मुलांचा सहभाग उल्लेखनीय होता. गणरायाला निरोप देताना लहान मुलांच्या डोळ्यांमध्ये अश्रू दाटले होते. शहराच्या विविध भागांत १८ हजार मूर्तींचे विसर्जन झाले, तर २२ हजार किलो निर्माल्य जमा झाले.