पुणे - नदी, कालव्यात गणपती मूर्ती विसर्जन न करता कृत्रिम हौदात विसर्जन करावे महापालिकेच्या आवाहनाला पुणेकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. १० दिवसात ६ लाख ५४ हजार ४१० गणेश मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत विसर्जन झालेल्या मूर्तीची संख्या जवळपास एक लाखाने वाढली आहे. तर ९ लाख २३ हजार ३९८ किलो निर्माल्य जमा झाले आहे.