Ganpati Visarjan : सलग दुसऱ्या वर्षी महापालिकेच्या मांडवात प्रशासक राज

पुणे महापालिकेवर प्रशासक असल्याने सलग दुसऱ्या वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळाचे स्वागत व मानाचे श्रीफळ देण्याचा मान महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाला.
Pune Municipal Corporation Administrative
Pune Municipal Corporation Administrativesakal

पुणे - पुणे महापालिकेवर प्रशासक असल्याने सलग दुसऱ्या वर्षी विसर्जन मिरवणुकीमध्ये मंडळाचे स्वागत व मानाचे श्रीफळ देण्याचा मान महापालिकेच्या अधिकाऱ्यांना मिळाला.

पुणे महापालिकेतील नगरसेवकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपली आहे. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकाच्या माध्यमातून कामकाज पाहिले जात आहे. विसर्जन मिरवणुकीत टिळक चौकात महापालिकेच्या मांडवात पूर्वी महापौर, आमदार, नगरसेवक मंडळाचे अध्यक्षांचे स्वागत करून मानाचा श्रीफळ देत असत.

महापालिकेत ज्या पक्षाची सत्ता आहे, त्यांचे या व्यासपीठावर वर्चस्व असायचे. मात्र, महापालिकेवर प्रशासक असल्याने या मांडवाकडे राजकीय प्रतिनिधींनी पाठ फिरवलेली आहे.

या मांडवात महापालिकेची ही परंपरा अधिकारी पुढे नेत आहेत. आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे हे सहकुटुंब उपस्थित होते. डॉ. कुणाल खेमनार, विकास ढाकणे यांनीही अनेक मंडळांचे स्वागत केले. ढाकणे विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत मांडवात थांबून होते. उपायुक्त माधव जगताप, नितीन उदास, जयंत भोसेकर, अविनाश सकपाळ, किशोरी शिंदे, संदीप कदम, पाणी पुरवठा विभागाचे प्रमुख अनिरुद्ध पावसकर, अधिक्षक अभियंता संतोष तांदेळ, श्रीधर येवलेकर, बिपीन शिंदे, मनिषा शेकटकर, नगरसचिवक योगिता भोसले आदी यावेळी उपस्थित होते.

पावसात मिळाला आसरा

विसर्जन मिरवणुकीमध्ये अनेक दांपत्य त्यांच्या लहान मुलांसह सहभागी झाले होते. मुसळधार पावसाला सुरवात झाल्यानंतर या दांपत्यांची चांगलीच तारांबळ उडाली. अनेकजण छत्री पकडून बाळ भिजू नये याची काळजी घेत होते. हे दृष्ट अधिकाऱ्यांच्या नजरेस पडताच त्यांनी या दांपत्यांना महापालिकेच्या मांडवात बोलवून आसरा दिला.

तृतीयपंथींनी सांभाळजी सुरक्षा

महापालिकेच्या सुरक्षा विभागाने तृतीय पंथी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली आहे. त्यांना यंदा महापालिकेच्या मांडवात सुरक्षेची जबाददारी देण्यात आली. महापालिकेचा पास, ओळखपत्र पाहिल्याशिवाय ते कोणालाही आत सोडत नव्हते. याचा फटका काही सहाय्यक आयुक्तांसह अभियंत्यांना बसला. अखेर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी फोन करून माहिती दिल्यानंतर त्यांना व्यासपीठावर येता आले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com