दौंडच्या बाजारपेठेत सुटली दुर्गंधी, पाच दिवसांपासून कचर संकलन बंद 

daund
daund
Updated on

दौंड  (पुणे) : दौंड शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना नगरपालिकेकडून सलग पाच दिवस कचरा संकलित करण्यात आला नाही. त्यामुळे बाजारपेठेत दुर्गंधी सुटली आहे. नगरपालिकेच्या तात्पुरत्या कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर पावसामुळे चिखल झाला आहे. त्यामुळे पंधरवड्यात दुसऱ्यांदा कचरा संकलन बंद आहे. 

दौंड शहर व परिसरात मागील पाच दिवस कमी- जास्त प्रमाणात पाऊस सुरू आहे. दौंड- सिध्दटेक रस्त्यावरून पुढे भाडेतत्वावरील जागेत तयार करण्यात आलेल्या तात्पुरत्या कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाल्याने कचरा वाहक वाहने तेथे जाऊ शकत नाहीत. परिणामी कचरा संकलन बंद आहे. बाजारपेठेतील कुंड्या तुंबल्याने दुर्गंधी पसरली असून, मोकाट गुरांनी कचरा विखरून ठेवला आहे. 

दौंड शहरातून दररोज 10 टन ओला व 8 टन सुका कचरा संकलित केला जातो. शहरात 45 पेक्षा अधिक कचरा कुंड्या असून त्या तुडूंब भरल्या आहेत. सप्टेंबर 2018 पासून कचरा डेपोसाठी शासकीय जागेचा शोध सुरू असून आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात त्याकरिता बैठका होऊन देखील ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांचे हाल सुरू आहेत. 

याबाबत आरोग्य निरीक्षक शाहू पाटील यांनी सांगितले की, कचरा डेपोकडे जाणारा सुमारे अडीच किलोमीटरच्या रस्त्यावर मुरूम टाकण्यात आला होता. तरीदेखील पावसामुळे चिखल झाल्याने वाहने जाऊ शकत नाही. मुख्याधिकारी हे पर्यायी जागेचा शोध घेत आहेत. ``
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com