esakal | नागरिकांनी काळजी करु नये, सरकार सर्वोतोपरी मदत करणार - उद्धव ठाकरे
sakal

बोलून बातमी शोधा

'नागरिकांनी काळजी करु नये, सरकार सर्वोतोपरी मदत करणार'

'नागरिकांनी काळजी करु नये, सरकार सर्वोतोपरी मदत करणार'

sakal_logo
By
विनायक होगाडे

रायगड : दुर्घटनाग्रस्त तळये गावांत मुख्यमंत्र्यांनी दौरा केला. त्यांनी या भागात पाहणी करुन माध्यमांशी संवाद साधलाय. त्यांनी म्हटलंय की, ज्याला आक्रित म्हणावं ते आक्रित घडतंय. या घटनांमधून आपल्या शहाणं होण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षांत पावसाळा चक्रीवादळानेच सुरु होतो. त्यामुळे हा अनुभव पाहता ज्या ज्या ठिकाणी अशा वस्त्या आहेत, त्यांचं पुनर्वसन करण्यसंदर्भात लवकरच आराखडा तयार करु. जेणेकरुन ही परिस्थिती पुन्हा उद्भवणार नाही. या गोष्टी लक्षात घेऊन नियोजन करु. सातारा, सांगली, कोल्हापूर, कोकण परिसरात झालेला संहार पाहता पाण्याचं नियोजन करायला हवं. त्याचं व्यवस्थापन करण्याची गरज आहे. सरकार त्यावर काम करतंय. गावकऱ्यांनी काळजी करु नये. त्यांना नुकसानभरपाई दिली जाईल.

हेही वाचा: दुर्घटनाग्रस्त जिल्ह्यांना मुख्यमंत्र्यांकडून मदतीची घोषणा

यापुढे अशा दुर्घटना घडून नयेत आणि घडल्या तर त्यात जीवित हानी होऊ नये, याची काळजी घेऊ. सगळ्या केंद्रीय यंत्रणांकडून आवश्यक ती मदत मिळतेय. बऱ्याच ठिकाणच्या नागरिकांचं स्थलांतर आपण केलं आहे, आणखी जिथे गरज आहे, त्यांचंही करु. पावसाचा परिणाम आणि प्रमाण कुणीही ठरवू शकत नाही नागरिकांनी काळजी करु नये, सरकार सगळी मदत करणार

हेही वाचा: कोरोना निर्बंध; पाहा मीराबाई पदक स्वीकारताना काय घडलं (VIDEO)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाड तालुक्यातील तळोई येथील दुर्घटनाभागाची पाहणी केली. त्यानंतर गंभीर पूरस्थितीचा सामना करण्यासाठी रायगड व रत्नागिरीसाठी प्रत्येकी दोन कोटी रुपयांची तर अन्य जिल्ह्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा केली आहे. राज्यात मागील पाच दिवसांत पावासाने हाहा:कार माजवला असून अनेकांचा संसार उद्धवस्त झाला आहे. कोकण-प. महाराष्ट्र पावसामुळे जायबंदी झाला आहे.

loading image
go to top