नगररोड परिसरात मोकळे प्लॉट बनतात कचर्‍याचे आगार | Garbage Depot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Garbage on Empty Plot
नगररोड परिसरात मोकळे प्लॉट बनतात कचर्‍याचे आगार

नगररोड परिसरात मोकळे प्लॉट बनतात कचर्‍याचे आगार

रामवाडी - नगररोड (Nagarroad) परिसरात काही मोकळे प्लॉट (Empty Plot) हे कचर्‍याचे (Garbage) आगार बनत आहे. प्लॅस्टिक पिशव्या, बाटल्या, शिळे अन्न, सडका भाजीपाला ,या ठिकाणी टाकत असल्याने सगळीकडे माश्या, चिलटे, डास वाढत आहे. अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरत असल्याने परिसरातील रहिवाशांच्या आरोग्यास (Health) धोका निर्माण झाला आहे.

प्रशासनाने मोकळ्या प्लॉट मध्ये कचरा टाकणार्‍या वर दंडात्मक कारवाई करावी. तसेच, सदर ठिकाणी स्वच्छता राखली जावी अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे.

स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत 2022 स्वच्छ पुणे सुंदर पुणे अभियान राबविले जात आहे. नगररोड क्षेत्रीय कार्यालयाच्या सबंधित विभागाकडून परिसर स्वच्छ ठेवला जात आहे. परंतु, ज्या मोकळ्या जागेत बांधकाम झाले नाही त्या ठिकाणी कचर्‍याचे ढीग साचत असुन प्रशासनकडून जाणूनबुजून दुर्लक्ष केले जात आहे का असा सवाल रहिवाशांकडून केला जात आहे.

हेही वाचा: पुणे : शास्त्री रस्त्यावर भरदिवसा विद्यार्थिनीचा विनयभंग

दीपा चव्हाण : वृंदावननगर, खराडी

रिकाम्या जागेचा वापर नसल्याने त्या ठिकाणी काही नागरिकांना कडून कचरा टाकला जात आहे. झाडेझुडपे वाढल्याने उंदीर, साप, विंचू वावर वाढला आहे. लहान मुले बाहेर खेळत असतात. दुर्दैवाने काही वाईट घटना घडू नये. यासाठी प्रशासनाने या समस्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे .

शिल्पा गलांडे : गलांडेनगर - वडगावशेरी

घरासमोर बिल्डरचा मोकळा प्लॉट आहे. रस्त्यावरुन ये-जा करणारे नागरिक या ठिकाणी कचरा टाकतात. काही लोक मृत जनावरे आणून टाकतात. मांस विक्रेते त्यांच्या दुकानातील टाकाऊ मांस या ठिकाणी टाकतात. डास, माश्या, चिलटे वाढले आहे. अस्वच्छतामुळे दुर्गंधी पसरली आहे. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या संबंधित विभागाने त्वरित लक्ष द्यावे अशी आम्हा सर्व रहिवाशांची मागणी आहे.

सुहास जगताप : सहाय्यक आयुक्त, नगररोड क्षेत्रीय कार्यालय

ज्या ठिकाणी मोकळे प्लॉट आहे त्या जागा मालकांना जागे भोवती कंपाऊंड घालून घ्यावे. अशी नोटीस देण्यात आली आहे. जे मोकळे प्लॉट आहे तिथे अस्वच्छता असेल तिथे त्या जागा मालकांवर दंडात्मक कारवाई केली जात आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punegarbage news
loading image
go to top