पुणे : शास्त्री रस्त्यावर भरदिवसा विद्यार्थिनीचा विनयभंग

"हेअर स्पा'मध्ये तरुणीची विनयभंगाची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी सदाशिव पेठेत स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थीनीचा भररस्त्यावर विनयभंग करण्याची धक्कादायक घटना घडली.
Women molestation
Women molestationsakal media
Updated on
Summary

"हेअर स्पा'मध्ये तरुणीची विनयभंगाची घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी सदाशिव पेठेत स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थीनीचा भररस्त्यावर विनयभंग करण्याची धक्कादायक घटना घडली.

पुणे - फर्ग्युसन महाविद्यालय परिसरातील "हेअर स्पा'मध्ये तरुणीची (Girl) विनयभंगाची (Molested) घटना ताजी असतानाच दुसऱ्याच दिवशी सदाशिव पेठेत स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थीनीचा भररस्त्यावर विनयभंग करण्याची धक्कादायक घटना घडली. हि घटना सोमवारी सकाळी अकरा वाजता शास्त्री रस्ता (Shastri Rasta) परिसरात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, सलग दोन दिवस तरुणींबाबत घडलेल्या या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा (Women Security) प्रश्‍न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवी पेठेत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हि सदाशिव पेठेत स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करते. सोमवारी सकाळी तरुणी तिच्या मैत्रीणींसमवेत नेहमीप्रमाणे शास्त्री रस्त्यावरून टिळक रस्त्याकडे जात होती. त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर त्यांच्यासमोर अचानक आलेल्या एका तरुणाने अश्‍लिल चाळे करण्यास सुरुवात केली. तसेच, त्यांच्याकडे पाहून त्यांना अश्‍लिल बोलण्यास सुरुवात केली. या प्रकारामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर विश्रामबाग पोलिसांनी अनोळखी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

Women molestation
मुदत उलटली; घाबरू नका, लस घ्या!

डेक्कन जिमखाना येथील "हेअर आर्ट' या स्पामध्ये गेलेल्या 26 वर्षीय तरुणीचा तेथील कर्मचाऱ्याने विनयभंग केल्याची घटना रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडली होती, या घटनेनंतर तरुणीने डेक्कन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. दरम्यान, डेक्कन पोलिसांकडून संबंधित कर्मचाऱ्यास नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शास्त्री रस्त्यावर भरदिवसा 25 वर्षीय तरुणीचा विनयभंगाचा प्रकार घडल्यामुळे महिला, तरुणींकडून संताप व्यक्त केला जात आहे.

दत्तवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स.प.महाविद्यालयाच्या समोरही दोन वर्षांपुर्वी एका स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीसमोर एका तरुणाने अश्‍लिल चाळे केले होते. त्याविषयी दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यास तत्काळ अटक करुन त्याच्यावर कडक कारवाई केली होती. त्यानंतर शहरात असा प्रकार घडला नाही. आता पुन्हा असे प्रकार घडू लागल्याने महिला व तरुणींकडून चिंता व्यक्त होऊ लागली आहे.

'शहरात सुरक्षित वातावरण आहे, म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातुन आम्ही तरुणी पुण्यात येतो. परंतु, अशा घटना घडल्यास आमच्या मानसिकतेवर व अभ्यासावरही परिणाम होईल. पोलिसांनी अशा विकृत व्यक्तींवर कडक कारवाई करावी.'

- मानसी वायदंडे, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणारी युवती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Preliminary Autopsy Report Reveals Cause of Death in Moshi Landfill Collapse
Three Women Warkaris Killed, Several Injured in Pune Crash
State Government Revamps Land Acquisition System; 103 Officer Posts Reorganized
Travel Alert: Pune–Mumbai Passengers Face Delays as 25 Trains Take Alternate Route
Marathi News Esakal
www.esakal.com