
हडपसर (पुणे) : परिसरात अनेक गृहप्रकल्पांची कामे सुरू आहेत. याशिवाय खासगी घरे व बंगल्यांची देखील कामे सुरू आहेत. ही कामे सुरू असताना टाकाउ बांधकाम साहित्य नदी, नाले, ओढयांच्या काठी अयोग्य पध्दतीने टाकण्यात येते. त्यामुळे मोठया प्रमाणात नैसर्गिक स्त्रोतांची हानी होते. तसेच पथपथ, मोकळ्या जागा आणि अडगळीच्या जागांवर बांधकाम साहित्य टाकल्याने अनारोग्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात निर्माण होणारा हा बांधकामाचा राडारोडा सुयोग्य पध्दतीने गोळा करून त्यावर शास्त्रोक्त पध्दतीने प्रकीया करणे, प्रक्रियेतून वेगळ्या झालेल्या बांधकाम संसाधनाचा पुनर्वापर महापालिकेच्या वतीने केल्या जाणा-या बांधकाम प्रकल्पात करणे तसेच खासगी प्रकल्पांमध्ये साहित्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे. त्यासाठी महापालिकेचे धोरण निश्चीत करणे गरजेचे आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
पाटबंधारे विभागाच्या दोन्ही कालव्याच्याकडेला मोठया प्रमाणात अवैधरित्या राडारोडा टाकला जात आहे. अनेक ठिकाणी राडारोडा थेट कालव्यात पडत आहे. वानवडी ते हडपसर या कालव्या दरम्यान मोठया प्रमाणात राडारोडा टाकला जात आहे. शासकीय व महानगरपालिकेच्या मोकळ्या जागेवर मोठया प्रमाणात राडारोडा टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांनी अनेकदा तक्रार करून देखील महापालिका व पाटबंधारे विभागाकडून याकडे दुर्लक्ष होत आहे.
याबाबत घनकचरा व्यवस्थापन प्रमुख ज्ञानेश्वर मोळक म्हणाले, राडारोडा टाकण्यासाठी नागरिक, बांधकाम व्यावसायिकांकडून ओढे, नाले, नदीकिनारी आणि मोकळ्या जागांचा उपयोग केला जात आहे.‘‘या सर्व प्रकारच्या राडारोड्याचे निर्मूलन करण्यासाठी पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने स्वतंत्र यंत्रणा तयार करण्याचे नियोजन केले आहे. राडारोडा वाहतूक करणे, त्यावर प्रक्रीया करणे, तो ठेवण्यासाठी जागा निश्चित करणे, संकलन करण्यात आलेला राडारोडा आवश्यकतेनुसार भूभरावासाठी आणि खाणीचा भाग समतल करण्यासाठी वापरणे आदींचा समावेश आहे. तसेच सहाय्यक आयुक्त कार्यालयाकडून बेकायदेशीर राडारोडा टाकणा-यांवर दंडात्मक कारवाई देखील केली जाते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.