
वारजे (पुणे) : विविध संस्थांनी मेहनत करून आमच्या जवळच्या टेकडीला वनराईचे रूप मिळवून दिले. पण आता याठिकाणी मोकाट जनावरे फिरू लागली आहेत. तसेच तळीरामांनाही याठिकाणीच पार्ट्या करायच्या असतात. या टेकडीला बकालपणा आलाय. सुंदर टेकडीचं आता दुर्गंधीचं माळरान होतंय. वनखात्याचे सेवक व मनपाचे अधिकारी व कर्मचारी यांनी वेळोवेळी फिरून संबधितांवर कारवाई करणे गरजेचे आहे, अशी तक्रार चंद्रकांत चौधरी यांनी मांडली. ते "बजाज अर्पण' संस्थेच्या माध्यमातून पर्यावरणासाठी काम करतात. तसेच या परिसरातील रहिवासी आहेत.
येथील शनि मंदिरासमोरील वनखात्याच्या जागेत व टेकडीवर गेले अनेक वर्षांपासून अनेक सामाजिक संस्थांच्या माध्यमातून विविध प्रकारची झाडे लावून त्याचे संवर्धन होत आहे. मात्र डुकरे, म्हशी, मोकाट कुत्री व तळीराम यांचे साम्राज्य येथे निर्माण झाल्याने फिरायला येणाऱ्या नागरिकांना त्रास होत आहे. याबाबत अनेकवेळा तक्रार करूनही कोणी दखल घेत नाही अशी तक्रार वारजे हायवे विकास प्रतिष्ठानचे संस्थापक बाबा धुमाळ यांनी केली आहे. या टेकडीवर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान, कमिन्स कंपनी, नेचर डिलाईट क्लब, सुदिक्षा फौंडेशन, वारजे पर्यावरण समिती, उद्यान विभाग पुणे मनपा, स्थानिक सोसायटीचे सभासद ज्येष्ठ नागरिक अशा अनेक संस्थाच्या प्रयत्नातून हजारो व्रुक्षाची लागवड व संवर्धन होत आहे. हे करीत असताना कमिन्स च्या वतीने या ठिकाणी पाईपलाईन तसेच पाण्याच्या टाक्या व हौदाची व्यवस्था केलेली आहे. या टेकडीवर रोज सकाळ संध्याकाळ शेकडो नागरिक या टेकडीवर फिरण्यासाठी व्यायाम व योगासाठी येत आहेत.
परंतु, आज या टेकडीवर जनावरे आणि तळीरामांनी बकालपणा आणला आहे. यामुळे नागरिकांना फिरायला जाण्यासाठी भीती वाटत आहे. परिसर अस्वच्छ झालेला आहे व दुर्गंधी पसरत आहेत. हौदात मोकाट जनावरे बसलेली असतात, अशी तक्रार निसर्ग ग्रुपचे निवृत्ती येनपुरे, कमिन्स ग्रुपचे संपत खैरे, दीपक चांदगुडे यांनी केली. या परिसरात पोलीसाचे फिरते पथक गरजेचे आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
आम्हाला फोन आल्यानंतर आम्ही लगेच कारवाई करत आहे. या ठिकाणीही पूर्वी कारवाई करण्यात आली आहे. तसे काही असल्यास येथे पुन्हा कारवाई केली जाईल.
- अभिजित माने, आरोग्य निरीक्षक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.