
पुणे : पुणे शहरातील ओल्या व सुक्या कचऱ्याचे प्रकल्प बंद पडल्याने अन्य प्रकल्पांवर ताण आहे. त्यातच महापालिकेने कोथरूड कचरा डेपोतील कचरा हस्तांतरणाची जागा (रॅम्प) महामेट्रोला दिल्याने कोथरूडसह वारजे, कर्वेनगर या भागांतील कचऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे.