कचरा वर्गीकरणाला शिस्त लागलीयं, संकलन व्यापक व्हावे 

कचरा वर्गीकरणाला शिस्त लागलीयं, संकलन व्यापक व्हावे 

पुणे - कचरा वर्गीकरणाला आता शिस्त लागलीय. काही सोसायट्यांमध्ये ओल्या कचऱ्यावर प्रक्रियाही केली जात आहे. आता कचऱ्याच्या संकलनाचे व्यवस्थापन व्यवस्थित व्हावे. गेल्या आठ वर्षांपासून आमच्या सोसायटीमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करून ठेवण्याची पद्धत सुरू आहे. यासाठी आम्ही दोन स्वतंत्र डबे ठेवले आहेत. तर घरातील सुका कचरा आम्ही प्रक्रिया करणाऱ्या संस्थेला देतो. त्यामुळे याची सवय आता येथील सर्व रहिवाशांना असल्याचे पाषाण येथील पंचवटी सोसायटीमध्ये राहणाऱ्या शैलजा जाधव या गृहिणीने सांगितले. महापालिकेकडून कचरा संकलनाचे व्यवस्थापन चांगले व्हावे, अशी अपेक्षा मात्र त्या व्यक्त करतात. 

घरातील कचऱ्याचे योग्यरित्या वर्गीकरण करण्यासाठी पुणे महापालिकेने सुका कचरा एक दिवसाआड घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओला कचरा हा दररोज गोळा केला जाणार आहे. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वेगळा करण्याची शिस्त तयार होईल, या हेतूने अशी नियमावली करण्यात आली आहे. पालिकेचा हा निर्णय असला तरी काही ठिकाणी दोन ते तीन दिवस कचरा गोळा केला जात नसल्याचे काही गृहिणींनी कळविले. प्रशासनामार्फत कचऱ्याच्या वर्गीकरणाबाबत वारंवार सांगूनही कित्येक नागरिक सुका व ओला कचरा एकत्रितपणे टाकत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. औंध येथील सानेवाडी कॉलनीमध्ये सुद्धा ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी सोय करण्यात आली आहे. 

बहुतेक वेळी कचरा घेण्यासाठी गाडी येत नाही. ओला आणि सुका कचरा घरातच ठेवला तर दुर्गंधी पसरते. बऱ्याच वेळी कचरा गोळा करण्यासाठी येणारे वाहन हे खालूनच कचरा गोळा करून जातात. त्यामुळे इतरांचा कचरा हा तसाच राहतो. 
- हर्षदा सोनवणे, गृहिणी 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गेली तीन वर्षे आम्ही सोसायटीतील कचरा गोळा करण्याचे काम करत आहोत. 10 पैकी 6 घरातील कचरा हा व्यवस्थित वेगळा केलेला असतो. मात्र काही लोक कचरा वेगळा करत नसल्याने आम्हीच तो वेगळा करून मग पुढे देतो. दोन्ही कचरा एकत्र असला तर तो घेतलाच जात नाही. 
- लीला सुतकर, सफाई कामगार 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या वतीने आता सुका कचरा हा दोन दिवसानंतर गोळा केला जाणार आहे. कचऱ्याचे वर्गीकरण नसल्यास 180 रुपयांपर्यंतचा दंड लावण्यात येईल. सध्या शहरातील सुमारे 70 टक्के नागरिक हे ओला व सुका कचरा वेगळा करून ठेवतात. 
- ज्ञानेश्वर मोळक, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख, महापालिका 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com