पुणेकरांनो, औंधमधील 'ते' दृश्य पाहून तुम्हीही म्हणाल हीच का स्मार्ट सिटी?

हरीश शर्मा
Friday, 3 July 2020

औंधरोड येथील भाऊ पाटील पडळ वस्ती येथील श्री भैरवनाथ मंदिरासमोरील खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता व पावसाचे पाणी साचून डबकी तयार झालेली आहे. त्या जागेच्या स्वच्छतेबाबत मनसेच्या वतीने सहाय्यक आयुक्त औंध क्षेत्रीय कार्यालयला अर्ज ही देण्यात आला असून पावसाळा सुरू झाल्यानंतर ही येथील स्वच्छता करण्यात आलेली नाही.

खडकी बाजार (पुणे) :  औंधरोड येथील भाऊ पाटील पडळ वस्ती येथील श्री भैरवनाथ मंदिरासमोरील खुल्या जागेत मोठ्या प्रमाणात कचरा जमा झाला होता व पावसाचे पाणी साचून डबकी तयार झालेली आहे. त्या जागेच्या स्वच्छतेबाबत मनसेच्या वतीने सहाय्यक आयुक्त औंध क्षेत्रीय कार्यालयला अर्ज ही देण्यात आला असून पावसाळा सुरू झाल्यानंतर ही येथील स्वच्छता करण्यात आलेली नाही. त्यामुळे येथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. येथील स्वच्छता महापालिकेच्या आरोग्य विभागाने त्वरित करून घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिवाजीनगर मतदारसंघ उपाध्यक्ष मयूर बोलाडे यांनी केली आहे.

कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत, पण हा व्यवसाय तेजीत

महापालिकेमार्फत सदर जागा जेसीबीच्या सहाय्याने स्वच्छ करण्यात आली. परंतु ज्या ठीकाणी पाणी जमा झालेले होते ती  डबकी जशीच्या तशीच आहे. त्यामुळे त्या साचलेल्या पाण्यामध्ये डासांची मोठ्या प्रमाणात पैदास झाली आहे. तसेच जो कचरा काढण्यात आला तो तिथेच जमा करण्यात आला व उचलला गेलेला नसल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कोरोनामुक्त रुग्ण घरी परतल्यावर स्वागत करताय तर... 

पुणे शहरामध्ये कोरोना रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्यामधे अजून दूस-या साथीच्या रोगाची भर पडू नये. यासाठी सदर ठिकाणचा साचलेला कचरा व डबक्यातील पाणी काढून तो खड्डा बुजवण्यात यावा अश्या मागणीचे लेखी निवेदन मनसेच्या वतीने बोलाडे यांनी औंध रोड क्षेत्रीय कार्यालयाला दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: garbage was collected in the open space at Bhau Patil Padal Vasti in Aundh Road