कचऱ्याचे काम 'स्वच्छ'लाच देणार

डॉ. बाबा आढाव यांना बैठकीत आश्वासन
pune
punesakal

पुणे : शहरातील कचरा संकलनाचे काम ' स्वच्छ ' संस्थेलाच दिले जाईल, दुसरी संस्था नियुक्त केली जाणार नाही, असे आश्‍वासन आज भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांना दिले. गेल्या अनेक वर्षापासून शहरात घरोघरी जाऊन स्वच्छचे कर्मचारी कचरा संकलनाचे काम करत आहेत. महापालिकेसोबतचा त्यांचा करार संपला असला तरी अद्याप त्याचे नूतनीकरण केले जात नाही, केवळ कामाला मुदतवाढ दिली जात आहे. त्यामुळे कचरा वेचकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, स्वच्छ ऐवजी दुसरी एजन्सी नियुक्त करण्यासाठी करार करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप यापूर्वी करण्यात आला होता. (Pune News)

pune
पुणे : अविनाश भोसलेंची आणखी 4 कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

दरम्यान, या मुद्द्यावर महापालिका भवनापुढे काच कागद पत्रा कष्टकरी पंचायतीतर्फे आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृहनेते गणेश बीडकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी स्वच्छचे काम काढले जाणार नाही असे आश्‍वासन दिले होते. पण गेल्या महिन्याभरात काहीच निर्णय झालेला नाही. त्यामुळे पुन्हा आज पासून (ता.९) साखळी उपोषण करण्याचा इशारा बाबा आढाव यांनी दिला होता. पण भाजपने आश्वासन दिल्याने १२ आॅगस्टपर्यंत आंदोलन स्थगित केले आहे.

pune
निर्बंध उठले; शहर गजबजले

याच पार्श्‍वभूमीवर आज डॉ. बाबा आढाव आणि पालिकेतील पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. स्वच्छ संस्थेचे काम काढून घेण्याचा कोणताही विचार पालिकेचा नाही. उलट हे काम अधिक चांगल्या पद्धतीने होऊन नागरिकांच्या तक्रारी कमी करण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने आवश्यक ती पावले उचलली जात आहेत. स्वच्छ संस्थेच्या कराराचे नूतनीकरण केले जाईल, असे गणेश बिडकर यांनी सांगितले. स्वच्छच्या कामगारांवर कोणताही अन्याय होणार नाही, महापालिका प्रशासनाने कराराचा प्रस्ताव ठेवावा अशा सूचना दिल्या आहेत, असे महापौर मोहोळ यांनी सांगितले. हेमंत रासने, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार व स्वच्छ संस्थेचे सेवक आणि पदाधिकारी उपस्थित यावेळी होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com