...तर महापालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकणार

ramwadi.jpg
ramwadi.jpg
Updated on

रामवाडी (पुणे)  : सोमनाथनगर- वडगावशेरी येथील गार्डेनिया सोसायटीत रविवारी (ता. 6) संध्याकाळी झालेल्या मुसळधार पावसाचे पाणी शिरल्याने अनेक रहिवाशांच्या वाहनांचे नुकसान झाले. येथील नैसर्गिक नाला बुजवला गेल्याने पावसाचे पाणी सोसायटीत शिरते. याबाबत वारंवार तक्रार करून देखील लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी कायमस्वरूपी उपाययोजना न केल्याने येत्या महापालिकेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष शरद अडसूळ यांनी सांगितले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गार्डेनिया सोसायटीत 175 सदनिका आहेत. सोसायटी बांधल्यापासून दरवर्षी पावसाळ्यात किमान तीन ते चार फूट पाणी येथे साचते. पावसाच्या पाण्याबरोबर ड्रेनेजचे पाणी मिक्‍स होत असल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरते. तसेच पाणी साचल्याने डासांचे प्रमाणही वाढते. त्यामुळे अनेक रहिवाशांना विविध आजारांना सामोरे जावे लागते. महापालिकेने तत्काळ येथे योग्य ती उपाययोजना करावी, अन्यथा येत्या निवडणुकीवर बहिष्कार आम्ही बहिष्कार टाकू असा इशारा सोसायटीतील रहिवाशांनी दिला आहे. 


महापालिकेचा प्रॉपर्टी टॅक्‍स आम्ही सर्वजण वेळेवर भरतो. तरीदेखील आम्हाला सरकारी यंत्रणेकडून काहीही मदत मिळत नाही. राजकीय नेत्यांकडून निवडणुकीच्या काळात काम करून देण्याचे फक्त आश्वासन दिले जाते. काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी वाहनांमध्ये शिरल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. 
-शांता ढमढेरे, स्थानिक रहिवासी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com