नसरापूर : नसरापूर (ता. भोर) येथील स्मशानभूमीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने १ कोटी १५ लाख रुपये खर्चून गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. मात्र, गेले दीड ते दोन वर्षे झाले तरी या प्रकल्पाचे लोकार्पण झालेले नाही. .नसरापूर ग्रामपंचायतीने याबाबत या प्रकल्पाचे काम निकृष्ट झाल्याचा आरोप करत प्रकल्प पूर्णत्वाचा दाखला न देता प्रकल्प ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या प्रकल्पाची अद्याप चाचणी होणे बाकी असल्याने प्रकल्प कार्यान्वित झाला नाही..भोर तालुक्यातील काही निवडक गावांपैकी नसरापूर येथे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये या गॅस शवदाहिनी प्रकल्पाची उभारणी केली आहे. जिल्हा वार्षिक योजनांतर्गत निधीमधून या प्रकल्पाला १ कोटी १५ लाख खर्च झाला आहे. तत्कालीन आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते १६ नोव्हेंबर २०२२ रोजी या प्रकल्पाचे भूमीपूजन झाले व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या देखरेखीखाली या प्रकल्पाचे काम केले आहे. मात्र, प्रकल्पाच्या इमारतीच्या पायापासूनच निकृष्ट काम होत असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला होता. मे २०२३ च्या जोरदार पावसामध्ये या इमारतीच्या पायाखालचा भरावच वाहून गेला होता. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांनी पायाभरणीला मुरूम ऐवजी माती वापरल्याचा व बांधकामास पाणी न मारल्याचा आरोप करत काम थांबवले होते. त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन ठेकेदारास पुन्हा काम करण्यास भाग पाडले होते. त्यानंतरही या प्रकल्पातील धुराची चिमणी कुठे बसवायची? यावरून अनेक वाद झाल्यावर एक जागा निश्चित करण्यात आल्यानंतर काम पूर्ण करण्यात आले..Ashadhi Wari : १८ वर्षांपासून दर महिन्याला ३२० कि.मी. पायीवारी; मंदिर न बांधलेल्या गावासाठी भक्ताचा संकल्प.या प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. ग्रामपंचायत सदस्यांनी वारंवार या कामाबाबत हरकत घेतली आहे तरीही काम तसेच पूर्ण करण्यात आले आहे. आता काम पूर्ण झाल्याचे ठेकेदार सांगत असला तरी इमारतीच्या स्लॅबचे प्लास्टर पडत आहे, स्लॅब गळत आहे, संरक्षक जाळी निकृष्ट दर्जाची आहे. खिडक्यांच्या काचा फुटल्या आहेत व प्रकल्पाची अंतिम प्रात्यक्षिक चाचणीही झालेली नाही. पूर्णत्वाचा दाखला दिलेला नसल्याने प्रकल्प ताब्यात घेतला नाही.- उषा कदम, सरपंच.या प्रकल्पातील फक्त बांधकाम माझ्याकडे होते, ते मी योग्यरीत्या पूर्ण केले आहे. मशिनरी बसविणाऱ्या एजन्सीकडे काम हस्तांतरित केले आहे. कामानंतर स्लॅब गळती असल्याची तक्रार आल्यावर वॉटरप्रुफिंगही केले आहे. माझ्या कामात काही त्रुटी नाहीत. तरीही त्रुटी दाखविल्यास पूर्ण केल्या जातील.- अमित कोंडे, ठेकेदार.गॅसदाहिनी हा प्रकल्प कामाच्या दर्जाबाबत तक्रारी व चिमणी बसवण्याची जागा याबाबत तक्रारी आल्यानंतर त्या सोडवून आता पूर्ण झाला असून, ग्रामपंचायतीच्या वतीने गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिल्यावर या प्रकल्पाची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात येणार आहे. लवकरच या बाबत कार्यवाही करून प्रकल्प ग्रामपंचायतीकडे हस्तांतरित केला.- वाय ओ. मेटेकर, शाखा अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.