
पुणे : गॅस सिलिंडर बसविण्यासाठी आलेल्या कामगाराने घरातील तीन वर्षांच्या चिमुकलीचा विनयभंग केल्याप्रकरणातील एकास न्यायालयाने पाच वर्षे सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंडाच्या रकमेपैकी चार हजार रुपये मुलीला देण्यात यावे, असेही जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. टाकळीकर यांनी निकालात नमूद केले आहे.