अरे बापरे ! गॅस सुरु करताच नवीन सिलेंडरने घेतला पेट; शेगडीसह पेटता सिलेंडर उचलला अन्...

सुदाम बिडकर
Monday, 14 September 2020

अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथे भर वस्तीत ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल विठ्ठल हिंगे यांच्या घरात शेगडीला नविन गॅस टाकी जोडल्यानंतर गॅस सुरु केल्याबरोबर टाकीने लगेचच पेट घेतला काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी टाकीला वेढले.

पारगाव (पुणे) : अवसरी बुद्रूक (ता. आंबेगाव) येथे भर वस्तीत ग्रामपंचायत सदस्य स्वप्निल विठ्ठल हिंगे यांच्या घरात शेगडीला नविन गॅस टाकी जोडल्यानंतर गॅस सुरु केल्याबरोबर टाकीने लगेचच पेट घेतला काही वेळातच आगीच्या ज्वाळांनी टाकीला वेढले. स्वप्निल हींगे यांनी धाडस करुन पेटता सिलेंडर शेगडीसह उचलून घराच्या बाहेर मोकळ्या पटांगणात आणून ठेवल्याने मोठा अनर्थ टळला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काल रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास हिंगे यांच्या आई कुंदा हिंगे स्वयंपाक करत असताना गॅस टाकी संपल्याने स्वप्निल हिंगे यांनी दुसरी टाकी शेगडीला जोडुन दिली दुसरी टाकी बसविल्यानंतर दोन मिनिटातच गॅसने पेट घेतला. सुरुवातीला नळीपासून रेग्युलेटर पर्यंत पेट घेत हळूहळू गॅस टाकीवर आगीच्या ज्वाळा दिसू लागल्या हिंगे यांनी धाडस दाखवत शेगडी व टाकी उचलून तात्काळ घराच्या बाहेर आणली. मोकळ्या वातावरणात हवा लागल्याने आणखीनच आग भडकू लागली. रेग्युलेटरमधून गॅसची नळी वेगळी झाल्याने फक्त गॅसच्या टाकीचा भडका होत राहिला. आगीच्या ज्वाळा 15 मिनीटे सुरु होत्या. परिसरातील नागरिक स्फोटाच्या भीतीने भयभीत झाले होते. हळूहळू टाकीतला गॅस संपल्याने आग विझली सुदैवाने टाकीचा स्फोट न झाल्याने मोठी दुर्घटना टळली.

 कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनो, अशाप्रकारे घ्या काळजी​
यासंदर्भात एचपी गॅसचे ग्रामिण वितरक साक्षी गॅसचे बाळशिराम भालेराव म्हणाले, आगीचा धोका टाळण्यासाठी नेहमी गॅस टाकीपेक्षा शेगडी उंच ठिकाणावर ठेऊन स्वयंपाक केला पाहीजे. सदर घटनास्थळी आमचे प्रतिनिधी जाऊन पाहणी करुन कंपनीला अहवाल पाठवणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gas cylinder explosion in Avsari Budruk