

sakal
Rising Gas Prices Push Need for Efficiency
पुणे : गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि वाढत्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या स्वयंपाकघरातील आर्थिक गणित बिघडले आहे. या पार्श्वभूमीवर, गॅस बचतीचे सोपे उपाय, इंडक्शनचा वापर आणि नियोजनबद्ध स्वयंपाक करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. स्वयंपाक करताना काही साध्या सवयी अंगीकारल्यास इंधनाचा वापर कमी करून खर्चात बचत करता येते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.