
कोथरूड (पुणे) : कोथरूडमधील महात्मा सोसायटीत रानगवा आल्याने परीसरात खळबळ माजली. महात्मा सोसायटीतील गल्ली नंबर एकमध्ये एका रिकाम्या जागेत हा गवा येऊन थांबला आहे. तत्पूर्वी त्याने दोन घराच्या गेटला धडक दिली. महात्मा, रोहन गार्डन, पुजापार्क, भारतीनगर मार्गे कोथरूड कचरा डेपोकडे गवा पळाला.
पहाटे पाचच्या सुमारास हा गवा सोसायटीत शिरला. रस्ता चुकल्याने बावरलेला हा गवा जागा शोधत सोसायटीत फिरत होता. कंपाऊंडची भिंत ओलांडून त्याने एका रिकाम्या जागेत प्रवेश केला. त्यामध्ये त्याच्या नाकाला थोडी जखम झाली.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
महात्मा सोसायटीचे अध्यक्ष महेश गोळे यांनी सांगितले की, ''गवा सदृश्य रानटी प्राणी सोसायटीत आल्याची घटना आमच्याकडे प्रथमच घडली आहे. परंतु आमच्याकडे मोर भरपूर आहेत. सकाळी 5.30 वाजता रहिवासी मॉर्निंग वॉकला बाहेर पडले त्यावेळी गवा आल्याचे समजले. सुरवातीला तो रेडा असल्याचे वाटत होते, पण नंतर फोटो बघून तो गवा असल्याचे स्पष्ट झाले. लोकांना पाहून तो बिथरला होता. त्याने सोसायटीतील 1-2 घरांचे गेटही तोडले. सोसायटीचे वॉचमन तो जाईल तसा जाऊन देत त्याचा मागोवा घेत होते. कोथरूड महात्मा सोसायटीचा 172 एकरचा परिसर आहे. एका बाजुला डोंगर आहे त्यामुळे त्याबाजूने आला असल्याचे शक्यता आहे.''
दरम्यान कोथरूड पोलीस, अग्निशमन दल, वनविभागाचे अधिकारी येथे घटनास्थळी डक्ट नसल्याने त्याला पकडण्यास उशीर होत आहे. एनडीएच्या जंगलातून हा गवा वाट चुकून येथे आला असावा असा प्राथमिक अंदाज वनक्षधिकारी दिपक पवार यांनी व्यक्त केला आहे.
- मोठी बातमी: शिक्षण सेवक भरतीला राज्य सरकारचा हिरवा कंदील; 6 हजार जागांसाठी होणार भरती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.