

Pune News: पुण्यातील सिग्नलवर अश्लील चाळे केल्याप्रकरणी गौरव आहुजाच्या मित्राला जामीन मंजूर झाला आहे. भाग्येश ओसवाल याला पुणे सत्र न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. भाग्येश ओसवाल हा गौरव आहुजा याचा मित्र आहे. आहुजाने अश्लील कृत्य केलं तेव्हा तो त्याच्यासोबत गाडीमध्ये होता.