Sharad Chandra Pawar Center of Excellence in AI Inaugurated
Sakal
बारामती: कृत्रिम बुद्धिमत्तेकडे केवळ सोयीसुविधा म्हणून नव्हे, तर राष्ट्रीय सामर्थ्य म्हणून पाहिले गेले पाहिजे, असे प्रतिपादन अदानी उद्योगसमूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी केले.
देशातील सर्वांत अत्याधुनिक व ग्रामीण जीवनाचा चेहरामोहरा बदलणाऱ्या विद्या प्रतिष्ठान शरदचंद्र पवार सेंटर ऑफ एक्सलन्स इन आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे उद्घाटन रविवारी (ता. २८) गौतम अदानी व अदानी फाउंडेशनच्या प्रमुख प्रीती अदानी यांच्या हस्ते झाले, त्या प्रसंगी ते बोलत होते.