Gautami Patil : पुण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली; कारण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Gautami Patil

Gautami Patil : पुण्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारली; कारण...

पुणे - महाराष्ट्रातील प्रसिद्ध लावणी कलावंत गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला पुण्यात परवानगी नाकारली आहे. जागेची NOC आणि ट्रॅफिक NOC नसल्याने पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. (Gautami Patil news in Marathi)

आज संध्याकाळी शिवणे येथे गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिवणे येथील धिवार यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन गौतमी पाटील हिच्या हस्ते होणार होते. मात्र कायदेशीर बाबी पूर्ण न केल्याने पोलिसांनी ऐनवेळी परवानगी नाकारली आहे.

गौतमी पाटील हीची क्रेझ पाहता कार्यक्रम स्थळी मोठी गर्दी होण्याची शक्यता होती. याआधी ही गौतमीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. अशा वेळी वाहतूकीचे नियंत्रण करणं आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणं कठिण होतं. त्यातच आज गौतमीच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आली.

टॅग्स :Pune News